Saturday, October 26, 2024
Google search engine
HomeUncategorizedनिशांत राऊत यांची उप सरपंच पदी बिनविरोध निवड

निशांत राऊत यांची उप सरपंच पदी बिनविरोध निवड

गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कोदामेडी – केसलवाडा ग्राम पंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच दि. 10 जुन रोजी पार पडली यात निशांत राऊत यांची बिनविरोध निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. या पूर्वी ग्राम पंचायत सदस्य म्हणून दोन वेळा निशांत राऊत यांना गावकऱ्यांनी निवडून दिले होते. आता सर्व सदस्यांनी त्यांची बिनविरोध उप सरपंच म्हणून निवड केली आहे.
महत्त्वपूर्ण म्हणजे कोदामिडी येथे पदावर असलेले पूर्व उपसरपंच यांच्यावर एप्रिल 2024 ला अविश्वास प्रस्ताव एक मताने पारित झाला होता. त्यामुळे हे पद खाली होते. म्हणून उपसरपंच पदाची निवड घेण्यात आली. ज्यामध्ये नऊ सदस्य संख्या असलेल्या ग्राम पंचायत मधून निशांत राऊत यांनी अर्ज दाखल केले होते. एकच अर्ज असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी सरपंच विनोद पुसाम, ग्रामसेवक आर. एम. बोरकर, ग्राम पंचायत सदस्य रामदास भिवगडे, सुलोचना मुनेश्वर, रोशनी शेलारे, कामिनी चांदेवार, कुसुम तरोणे, अंजुम खान व गावकरी उपस्थित होते. झालेल्या निवडणुकी मध्ये एकमताने निशांत राऊत यांची निवड झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
http://panchyatkhabar.com/wp-content/uploads/2023/03/ad1-e1679401545250.jpg

Most Popular

Recent Comments