Saturday, June 22, 2024
Google search engine
HomeUncategorizedनूतन वर्षे महिलांसाठी सर्वात जास्त आनंदायी येणार : ना. आदीतीताई तटकरे

नूतन वर्षे महिलांसाठी सर्वात जास्त आनंदायी येणार : ना. आदीतीताई तटकरे

गोंदिया : जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी शासन विविध स्तरांवर प्रयत्नशील आहे. येणारे नुतन वर्षी महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी विविध योजना आणण्यासाठी कटिबद्ध असल्याने येणारे वर्षे महिलांसाठी अधिक आनंददायी ठरणार असल्याचे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री ना.आदिती सुनिल तटकरे यांनी गोंदिया येथे आयोजित कार्यकर्ता भेट कार्यक्रमात केले.
एन.एम.डी महाविद्यालय सभागृहात महिला व बालकल्याण अधिकारी, बचत महिला पदाधिकारी, महिला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांचे भेट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ना.आदिती सुनिल तटकरे, प्रमुख अतिथी माजी आमदार राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, निखिल जैन, पुजा अखिलेश सेठ, सुरेश हर्षे, केतन तुरकर, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ना.आदितीताई तटकरे यांना गोंदिया शिक्षण संस्था द्वारे स्मृती चिन्ह देवून गौरविण्यात आले.
माजी आमदार राजेंद्र जैन यांनी मार्गदर्शन करताना महायुतीचा कार्यप्रणाली व महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना विषयी सविस्तर माहिती सांगितली. ना.आदितीताई तटकरे पुढे म्हणाल्या की, आज महिला हे राजकीय नेतृत्व ठरवित आहेत. त्यांची भुमिका अतिशय महत्त्वाची आहे. महिला राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी महत्वाची भुमिका वठवित आहे. शासनाच्या विविध योजना ह्या महिलांसाठी विकासाची पर्वणी आहे. अंगणवाडी सेविका यांच्या समस्या लवकरच सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. प्रास्ताविक भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्ष डॉ.माधूरी नासरे यांनी महिलांच्या समस्या व अंगणवाडी सेविका यांचे महत्वाचे योगदान सांगितले.
यावेळी अश्विनीताई पटले, नेहाताई तुरकर, सौ. सविता मुदलियार, सुशिला भालेराव, रजनी गौतम, कुंदा दोनोडे, सरला चीखलोंढे, किर्ती पटले, लता रहांगडाले, पुष्पकला माने, सौ. अनिता चौरावार, सौ कुंदा पंचबुद्धे, सौ. मोनिका सोनवाने, दिपा काशीवाल, ज्योत्सना सहारे, रूचीता चौहान, उमेश्वरी चुटे, रुपा श्रीवास्तव, मोनिका सोनवाने पायल बग्गा, पायल भेलावे, संगीता माटे, स्वाती शर्मा, माधुरी परमार, सरिता बरईकर, नयना समुद्रे सहीत मोठया संख्येने अंगणवाडी सेविका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यां उपस्थित होते. कार्यक्रमांचे संचालन सुशिला भालेराव यांनी केले तर आभार कुंदा दोनोडे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments