गोंदिया : एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोघांना दृष्टी मिळू शकते. त्यामुळे नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या झरपडा येथील एका व्यक्तीने जिवंत असतानाच नेत्र दानाचा संकल्प केला होता. त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी लगेच नेत्र दानासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मानवतेचा परिचय दिला.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात येत असलेल्या झरपडा येथील नारायण सकरु शहारे हे दिनांक 2/3/2023 ला मृत्यु पावले. मेल्यानंतर आपले डोळे हे दृष्टीहीन व्यक्तीच्या कामी यावे या हेतुने त्यांनी डोळे दान करण्याचा संकल्प जिवंत असतानाच केला होता. ते मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी लगेच गोंदिया येथील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत सम्पर्क साधून याबाबत माहिती दिली. आणि लगेच डॉक्टरांची टीम झरपडा येथे दाखल झाली आणि त्यांनी लगेच डोळे काढले. यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी होकार देऊन वडिलांनी घेतलेला निर्णय पूर्ण करून त्यांची इच्छा पूर्ण केली. जणु या युगातील श्रावणबाळ हे शहारे कुटुंबीय असल्याचे बोलले जाते. त्याच्या मागे एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
नेत्र दान श्रेष्ठ दान : मरणोपरांत डोळे दान करून शहारे परिवाराने दिला मानवतेचा संदेश
RELATED ARTICLES