Wednesday, April 24, 2024
Google search engine
HomeUncategorizedनोकरीच्या नावावर तरुणीवर अत्याचार

नोकरीच्या नावावर तरुणीवर अत्याचार

भंडारा : पोलिस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या चुल्हाड येथे १0 मार्च २0२३ रोजी नोकरी लाऊन देण्याच्या नावावर दोघा नराधमांनी १८ वर्षीय पिडीतेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील दोघा नराधमांना सिहोरा पोलिसांनी अटक केली असून आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील कुंभली येथील १८ वर्षीय तरुणी ही जानेवारी २0२३ मध्ये बालाघाट येथे एका बगीच्यात एकटी बसली असतांना आरोपी मुशरान जाहिद खान (२२) रा. गौसनगर बालाघाट व रोहित कमल भोयर (२३) रा. कोरणी जि. गोंदिया यांनी तरुणीला एकटी पाहून रेल्वेमध्ये नोकरी करशील का, असे आमिष देऊन तिचा मोबाईल क्रमांक घेतला. १0 मार्च २0२३ रोजी पिडीतेचा जीवशास्त्र विषयाचा पेपर असल्याने बालाघाट येथे गेली. पेपर संपल्यानंतर शाळेबाहेर असलेल्या आरोपींनी तिला आमिष देऊन गोंदिया येथे घेऊन गेले. त्यानंतर तिला चुल्हाड येथे आणून तिचेवर अत्याचार केले. दुसर्‍या दिवशी आरोपी रोहित भोयर याने बळजबरीने तिच्या डोक्यावर कुंकू लाऊन ओरिसा राज्यातील रेगांडी येथे घेऊन गेला. मुलीच्या आई-वडीलांनी मुलीच्या शोधात रेगांडी गाठले असता मुलगी एका घराबाहेर दिसून आली. घडलेला प्रसंग आई-वडीलांना सांगितला. पिडीतेने पोलिस स्टेशन बालाघाट येथे १२ एप्रिल रोजी तक्रार नोंदविली. मात्र घटनास्थळ सिहोरा पोलिस स्टेशन हद्दीत येत असल्याने गुन्हा दाखल करुन तपासात घेण्यात आला.
सिहोरा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता १८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सदर प्रकरण पोलिस स्टेशन सिहोराचे पोलिस उपनिरीक्षक महेंद्र सहारे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments