Tuesday, June 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedपंतप्रधान मोदींचे ध्येय गरिबांच्या हिताचे : देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान मोदींचे ध्येय गरिबांच्या हिताचे : देवेंद्र फडणवीस

गोंदिया : नरेंद्र मोदी यांना तिसन्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अशोक नेते घांना विजयी करायचे आहे. गेल्या १० वर्षाच्या कार्यकाळात मोदी सरकारने देशातील प्रत्येक समाज घटकाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. २५ कोटी नागरिकांना दारिखकारेषेच्या बाहेर काढण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार हे सामान्य व गरिबांचे असत्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गडचिरोली-चिमूर लोकसभेचे
प्रभावी शक्ती महायुतीचे उमेदवार अशोक नेते पांच्या प्रचारासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव च्या प्रांगणात गुरुवार,१४ एप्रिल रोजी आयोजित भव्य प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,लोकसभेचे उमेदवार अशोक नेते, माजी आमदार केशवराव मानकर, भेरसिंग नागपुरे, संजय पुराम, राकाचे माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र नायडू, भाजपा जिल्हाध्यक्ष अँड येशुलाल उपराडे माजी जीप अध्यक्ष विजय शिवनकर, सुरेश हर्षे, राजु पटले, अनिल सोनकनेवरे, यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाते. की विदर्भाचा समृद्धी महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. समृद्धी महामार्ग आता गोंदिया पर्यंत करण्याच्या निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते गोंदिया हे अंतर ८ ते ९ तासांत पूर्ण करता येईल. मागील एका वर्षात मोदींच्या नेतृत्वात लोकांना घरकुल, शौचालय व पिण्याच्या स्वच्छ पाणी मोदींनी आखलेल्या पोजनेच्या माध्यमातून नागरिकांच्या घराघरात पोहोचले आहे.मोदिंचे इंजीन हे सर्व सामान्य माणसाला घेवून चालणारी आहे शेतकऱ्यांना ६ हजार आणि आपले महाराष्ट्र शासन ६००० अशा प्रकारे १२००० रुपये किसान सन्मान निधीमध्ये दिले. जनतेला आयुष्यमान भारत सरकार पोजना, अशा विविध पोजना, विकासकामे केली आहेत. आचार संहिता संपताच सुप्रीम कोर्टात सालीशिटर जनरल उभे करून आमगाव नगर परिषदेच्या समस्या सोडवणार असल्याचे सांगत नगर परिषदेला भरपूर निधी उपलब्ध करुन देणार हि भुमी भवभुती महाकवी यांची आहे, लक्षणराव मानकर गुरुजी तसेच महादेवराव शिवनकर यांनी पक्ष वाढवण्याचे कार्य केले आहे येत्या १९ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत विकासपुरुष अशोक नेते यांना निवडून दिल्लीला पाठवा असे आवाहन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments