गोंंदिय. अर्जुनी मोरगाव तालुक्यात 13 ऑगस्ट रोजी कोतवाल पदाकरिता परीक्षा घेण्यात आली .व त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील बारा कोतवालांना आज तारीख 18 ऑगस्टला तहसील कार्यालय येथे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
सन 2017 पासून रेंगाळलेली कोतवाल भरती परीक्षा अनेक कारणाने गाजली. यावर्षी अर्जुनी मोरगाव उपविभागातील सडक /अर्जुनी चार जागा व अर्जुनी मोरगाव तालुका 12 कोतवाल असे एकूण 17 जागांसाठी लेखी परीक्षा 30 जुलै रोजी घेण्यात आली होती. यामध्ये सडक अर्जुनी तालुक्यातील चार जागांसाठी 83 उमेदवार तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बारा जागांसाठी 394 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. मात्र कोतवाल भरती परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप करीत परीक्षार्थ्यांनी आंदोलन व उपोषण केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी यांचे सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी वरुण शहारे यांनी ही परीक्षाच रद्द केली होती. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सोळा कोतवाल पदासाठी सरस्वती विद्यालयातील एकाच केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे च्या देखरेखी खाली व पोलीस बंदोबस्तात परीक्षा घेण्यात आली व त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात आला. व आज तारीख 18 ऑगस्टला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोतवाल परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या 12 उमेदवारांना तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यामध्ये पवनी धाबे साजा क्रमांक 27 दीपक राऊत, पांढरवाडी माल.4 यशवंत कोरे, माहूरकुडा 18 गुलशन कापगते, चिचोली 22 अतुल काटेंगे, शिलेझरी 13 ऋषभ कोरे, धाबेटेकडी /आदर्श त्रोषीक लंजे, नवेगाव बांध 5 सुनील सांगोलकर, अर्जुनी 9 रीना परिहार, ईटखेडा 17 विद्या मेहंदळे, भरणोली 25 खोमेस ताराम, खामखुरा 19 भाग्यश्री आकरे, गोठणगाव 26 वर्षा बोरकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी दिली. यावेळी नायब तहसीलदार जी .एस .सोनवाणे, एम. के. क्षीरसागर तथा कर्मचारी रूपचंद नाकाडे, आशिष रामटेके व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात एकूण 21 कोतवाल पदाच्या जागा रिक्त होत्या. त्यामध्ये शासनाच्या 80% कोतवाल भरती कपात निर्णयाने 17 जागा भरण्याचे निश्चित झाले. तसे आरक्षण सुद्धा काढण्यात आले होते. त्यातही चार जागांसाठी अर्जच आले नसल्याने 13 जागांसाठी परीक्षा निश्चित करण्यात आली होती. त्यातही देवलगाव येथे आर्थिक दुर्बल घटकासाठी आरक्षण होते मात्र यामध्ये संबंधितांनी अर्जच केला नाही. केवळ अनुसूचित जातीच्या महिला उमेदवाराने अर्ज केला. त्यामुळे या गावची परीक्षा घेण्यात आली नाही .त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या बारा कोतवालांना नियुक्तीपत्र देण्यात आले.