Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedपागंडी,केरझरा,हरीतलाव परिसरात पार्ट्यांवर बंदी तर जंगलातील फार्महाऊसवर होणार कारवाई

पागंडी,केरझरा,हरीतलाव परिसरात पार्ट्यांवर बंदी तर जंगलातील फार्महाऊसवर होणार कारवाई

जिल्हास्तरीय व्याघ्र कक्ष समितीच्या बैठकीतील निर्णय
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील विविधतेने नटलेल्या जंगलातील वन्यप्राण्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीकोनातून जिल्हास्तरीय व्याघ्र कक्ष समितीच्या 28 मार्चला झालेल्या बैठकीत गोंदिया शहरानजीक असलेल्या पर्यटनस्थळावरील विकेंट पार्ट्यांवर बंदी घालण्यासोबतच जंगलात तयार करण्यात आलेल्या फार्महाऊसवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या काॅन्फरंस हाॅलमध्ये झालेल्या या बैठकीला पोलीस अधीक्षक निखील पिंगळे तसेच उपवनसरंक्षक कुलराज सिंह उपस्थित होते.व्याघ्र कक्ष,समितीच्या झालेल्या या बैठकीत आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी जवळील पागंडी,केरझरा,हरीतलाव येथील पर्यटकांच्या पार्ट्यांना बंदी घालण्याचा निर्णय हा पर्यटकांच्या आनंदावर विजरण घालण्यासारखाच म्हणावा लागणार आहे.
या बैठकीत वन्यजीव व वन संरक्षणाची वाढती गरज लक्षात घेता वन्य प्राण्यांविषयी होणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनेच्या शोध घेऊन वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने शासनाने पोलीस विभाग व वन विभाग व इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यासाठी विविध स्तरावर व्याघ्र कक्षाची निर्मिती केलेली आहे. त्यानुसार गोंदिया जिल्हास्तरीय व्याघ्र कक्ष समितीचे गठन करण्यात आले. या समितीच्या बैठकीत गोंदिया जिल्ह्यात विद्युत प्रवाहामुळे वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या घटनांत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली.तसेच यावर आळा घालण्यासाठी पोलीस विभाग,विद्युत विभाग व वन विभागाने समन्वय साधून विद्युत प्रवाहाद्वारे वन्य प्राण्यांच्या होत असलेल्या शिकारीवर आळा घालून शिकार करणाऱ्या गुन्हेगारांवर वनगुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले.
नवेगाव नागझिरा वनपरिक्षेत्र भागात महिन्यातून एकदा पोलीस विभाग व वन विभागाने संयुक्त गस्त राबवावे.नवेगाव नागझिरा वनपरिक्षेत्रातील मुरदोली भागात गोंदिया ते कोहमारा राज्यमार्गावर वन्य प्राण्यांच्या आवागमन संबंधाने ट्राफिक आणि स्पीड कंट्रोलकरिता बॅरिगेटिंग करणे, स्पीड कंट्रोल करणे याबाबत चर्चा करुन बांधकाम विभागाला पुढाकार घेऊन उपाययोजना करण्याची सुचना देण्यात आली.
या बैठकीत विशेषतः नवेगाव नागझिरा वनक्षेत्रं परिसरातील मंगेझरी भागात ब्लॅक पॅंथर( अत्यंत मूल्यवान काळा बिबट) च्या शिकारी (मारल्या) बाबतच्या घटने संबंधाने सविस्तर चर्चा करण्यात आली. व सदर घटना घडल्यानंतर सदर घटनेच्या अनुषंगाने सदर परिसरातील जनतेत जास्तीत जास्त जनजागृती करणे, सदर परिसरातील जनतेत काळा बिबट( ब्लॅक पँथर) किती महत्त्वाचे आहे. तसेच अश्या दुर्मिळ वन्यजिवामुळे आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढून रोजगार उपलब्ध होऊ शकतो हे जोपर्यंत लोकांना कळणार नाही तोपर्यंत अश्या घटनावर प्रतिबंध येणार नाही.याकरीता सर्व विभागांनी मिळुन जंगलव्याप्त भागातील जनतेत जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे तसेच उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांनी व्यक्त केले.नवेगाव नागझिरा वन विभाग अंतर्गत येत असलेले नॅशनल हायवे, स्टेट हायवे भागात अंडर पासेस तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.बैठकीला उपस्थित सर्व सदस्यांचे विभागीय वनअधिकारी प्रविण पाटील यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments