गोंदिया : जलशक्ती मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून सन 2018 पासून राष्ट्रीय जल पुरस्कार देण्यात येत आहे. यावर्षी जलसंवर्धन व व्यवस्थापन संबंधित नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हापातळी ते ग्रामपंचायत पातळीपर्यंत विविध संस्थांना व वैयक्तिक स्तरावरून नामांकन भरणेबाबत आवाहन करण्यात आलेले आहे. नामांकन हे प्रामुख्याने जलसंवर्धन व व्यवस्थापन संबंधित नाविण्यपूर्ण काम करणारे उत्कृष्ट राज्य, उत्कृष्ट जिल्हा, उत्कृष्ट ग्रामपंचायत, उत्कृष्ट शाळा व महाविद्यालय, उत्कृष्ट संस्था (शाळा व महाविद्यालय वगळून), उत्कृष्ट समाज संस्था, उत्कृष्ट पाणी वापर संस्था व उत्कृष्ट काम करणारी व्यक्ती यांच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर(www.awards.gov.in ) दि. 15 डिसेंबर अखेरपर्यंत भरणे आवश्यक आहे. नामांकन भरण्यासाठी मागील एक वर्ष कालावधीत जलसंवर्धन व व्यवस्थापन संबंधित काम केलेल्या संस्था व व्यक्ती या पात्र असणार आहेत.
या पुरस्कारासाठी गोंदिया जिल्हयामध्ये जलसंवर्धनाचे व व्यवस्थापनाचे उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालये, समाजसंस्था किंवा उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती यांनी या स्पर्धेसाठी नामांकन भरावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे. जिल्हयातून नामांकन भरलेल्या संस्था/ व्यक्ती यांनी आपली संक्षिप्त माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या iecwssogondia@gmail.com या मेलवर दिनांक 18 डिसेंबर 2023 अखेर सादर करावी, असे आवाहन जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे यांनी केले आहे.
पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 साठी शुक्रवार पर्यंत नामांकन करावे
RELATED ARTICLES