गोंदिया : पार्ट टाइम जॉब लावून देण्यासाठी विविध खात्यांवर पैसे मागवून तरुणाला तीन लाख ६६ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार शहर पोलिस ठाण्यांतर्गत गणेशनगर परिसरातील व्यक्तीसोबत २३ ते २९ सप्टेंबर २०२३ दरम्यान घडला आहे.
फिर्यादी ओमेश तिलकचंद कापगते (३०, ह. मु. शादा कॉन्व्हेंटजवळ, गणेशनगर) यांना आरोपी अमर नानोरीया, नैना फातिमा व अजय शर्मा नामक व्यक्तींनी पार्ट टाइम जॉब देतो, असे आमिष देऊन विश्वासात घेतले. त्यानंतर त्यांना रॉयल कॅफेच्या आयसीआयसीआय बॅंक खात्यावर, जासविन कॉस्मेटच्या आयसीआयसीआय बॅंक खात्यावर, इगल अर्थ मूव्हर्सच्या पंजाब नॅशनल बॅंकेच्या खात्यावर, जहीरूल इस्लमच्या आयसीआयसीआय बॅंक खात्यावर तसेच कालींडी मेडिकल स्टोर्सच्या आयसीआयसीआयच्या बॅंक खात्यावर एकूण तीन लाख ६६ हजार रुपये मागवून त्यांची आर्थिक फसवणूक केली. पोलिसांनी भादंवि कलम ४२०, ३४, ६६(डी) माहिती तंत्रज्ञान कायदा अधिनियम २००० अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
पार्ट टाइम जॉबच्या नावावर तरुणाला ३.६६ लाखांनी लुटले
RELATED ARTICLES