गोंदिया : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे 22 डिसेंबर 2023 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून तहसिल कार्यालय आमगाव येथे दुपारी 3.30 वाजता जनता दरबार कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सदर जनता दरबारास जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तसेच तालुक्यातील सर्व विभागातील तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी आमगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या समस्यांचे निराकरण करण्याकरीता जनता दरबारात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून समस्यांचे निराकरण करुन घ्यावे. असे आवाहन तहसिलदार, आमगाव यांनी केले आहे.
पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा आमगाव येथे 22 डिसेंबरला जनता दरबार
RELATED ARTICLES