गोंदिया : महीला फिर्यादी कु. मेश्राम रा.पि.पि. कॉलेज रोड आंबेडकर वार्ड, सिंगल टोली गोंदिया हीचे राहते घराचे समोरील दरवाज्या ची कडी उघडुन घरातील मोबाईल व सोन्या चांदीचे दागिने व नगदी रोख 10,000/- रु असा एकुण 25,000/- रु. चा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने फिर्यादीचे तक्रारी वरुन पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे अपराध क्रं. 235/2023 कलम 457, 380 भादवि अन्वये अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांचे आदेश व तपासात दिलेल्या निर्देश सुचना प्रमाणे पोलीस स्टेशन गोंदिया शहर चे पो.नि. श्री. चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदारांनी गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी पवन अशोक पशिने वय 25 वर्षे रा. भटेरा चौकी बालाघाट जि. बालाघाट (म.प्र.) यास गुन्ह्यांत अटक करून नमूद गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल सोन्याचे टॉप्स 2 नग व.अ.3 ग्रॅम, एक विवो कंपनीचा मोबाईल कि.3000/- रु, एक जोड चांदीची पायल वजन अं. 5 तोडे कि.2000/- रु 4) नगदी- 2000/-रु. असा मुद्देमाल आरोपी यांचेकडुन जप्त करण्यात आले होते. सदर गुन्हयाचा सखोल तपास पो. हवा. जागेश्वर उईके पो.स्टे. गोंदिया शहर यांनी केला असून गुन्ह्यात जप्त मुद्देमाल मा.न्यायालयाचे आदेशाने महिला फिर्यादी कु.मेश्राम रा.पि.पि. कॉलेज रोड,आंबेडकर वार्ड सिंगल टोली गोंदिया यांना आज दि.22/06/2023 रोजी पो.नि.श्री.चंद्रकांत सुर्यवंशी यांचे उपस्थितीत पोलीस स्टेशनला सुपुर्द नाम्यावर देण्यात आले आहे.
पोलिसांनी गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादीस केले परत
RELATED ARTICLES