गोंदिया : अनेक गुन्ह्यात वापरलेली, अपघातग्रस्त वाहने पोलिसांकडून जप्त केले जातात, अशी हजारो वाहने पोलिस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. या वाहनांचे स्पेअरपार्ट चोरीस जातात, चांगली सुस्थितीतील वाहने अनेक वर्षांच्या दुर्लक्षामुळे आता भंगारात विकण्याच्या अवस्थेत आली आहे. वाहनांची निर्गती होत नसल्याने पोलिस ठाणे परिसरात वाहन ठेवण्यासाठी जागाच नाही.जिल्ह्यात दारूची अवैधरित्या वाहतूक करणार्यांवर कारवाई करून त्यांची वाहने जप्त केली जातात. अनेकदा वाहनांची कागदपत्रे नसल्याने ते वाहन सोडवू शकत नाहीत. पोलिस ठाण्यांत अशा वाहनांची संख्या सर्वाधिक आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यात अशा भंगार वाहनांची रांग दिसते. पोलिसांना कारवाईत सापडलेली वाहने जागेवर सडत आहेत, अशा वाहनांमधील काही स्पेअर पार्ट काढून घेतले जातात. अशा तक्रारीही असतात. मात्र, वाहनांची स्थितीच इतकी भंगार झालेली असते, की या पार्टचा वापर होण्याची शक्यता कमीच असते. सध्या तरी अशी वाहने धूळखात आहेत. पोलिस ठाण्यांमध्ये चोरीचा मुद्देमाल, इतर गुन्ह्यातील वाहने अनेक वर्षांपासून बेवारस पडून आहे. अशा वाहनांचा आता हिशोबही लागने कठीण झाले आहे. ज्यांनी आपली वाहने न्यायालयातून सुपूर्तनाम्यावर सोडविलेली नाही, अशी वाहने जमा केली जातात. त्यानंतर वाहनांचा लिलाव करण्यासाठी न्यायालयातून परवालनगी मागितली जाते. न्यायालयाने परवानगी दिल्यावर ही वाहने स्क्रॅपसाठी भंगारात विकली जातात.
पोलिसांनी जप्त केलेले वाहन झाले भंगार
RELATED ARTICLES