गोंदिया : जिल्ह्याच्या आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलिस उपनिरीक्षक हरीशचंद्र गोपीचंद चांदेवार व पोलिस अमलदार सहायक पोलिस उपनिरीक्षक शंकर लक्ष्मण शेंडे यांचा पोलिस अधीक्षक कार्यालयात मंगळवार, 28 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गोपीचंद चांदेवार व शंकर शेंडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र देऊन सत्कार केले. यावेळी पोलिस निरीक्षक नंदिनी चानपुरकर, पोलिस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. संचालन पोलिस निरीक्षक नंदिनी चानपुरकर यांनी केले. यशस्वीतेसाठी पोलिस हवालदार राजू डोंगरे, सुनील मेश्राम आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
पोलिस कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती सत्कार
RELATED ARTICLES