गोंदिया पोलीस दलाचा कल्याणकारी नाविण्यपूर्ण स्तुत्य उपक्रम
गोंदिया : गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील जनतेच्या हिताकरीता (विशेषतः नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या कल्याणाकरीता) कायम अग्रेसर राहुन विविध कल्याणकारी नाविण्यपूर्ण उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या संकल्पनेतुन तसेच अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील गोरगरीब, आदिवासी भागात वास्तव्यास असणाऱ्या आणि शाळा-कॉलेजच्या शिक्षणाकरिता 5 ते 10 कि. मी. पायी पायी ये-जा करणाऱ्या अशा गरजु गरिब व आदिवासी मुलींना पायी ये-जा करण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही, जेणेकरुन त्यांचा वेळ वाचुन त्यांना शिक्षणाकरिता भरपुर वेळ मिळुन अभ्यासाला वाव मिळेल व त्यांचे आरोग्य सुदृढ राहुन त्यांचा सर्वांगीण विकास होईल आणि पोलीस व जनता यांच्यातील आपुलकीची भावना निर्माण होण्यास चालना मिळेल यादृष्टीने गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकाराने रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट, तसेच माऊली मित्र मंडळ नागपूर यांच्या सौजन्याने 27 डिसेंबर 2023 रोजी पोलीस स्टेशन सालेकसा येथे पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे सशस्त्र दुरक्षेत्र पिपरीया, बिजेपार व दरेकसा येथील गरजु शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.
गोंदिया जिल्हा पोलीस दल आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट, तसेच माऊली मित्र मंडळ नागपूर यांच्या सौजन्याने आयोजित कार्यक्रमाअंतर्गत अतिदुर्गम आदिवासी भागातील गरजू गोरगरीब विद्यार्थ्यांना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्टचे प्रेसीडेंट राजीव वरभे, माऊली सेवामित्र मंडळाचे अध्यक्ष सुहास खरे यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, तसेच रोटरी क्लब साऊथ ईस्ट नागपूरचे प्रेसीडेंट राजीव वरभे, माऊली सेवामित्र मंडळाचे अध्यक्ष सुहास खरे यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना 15 सायकलींचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील इतर 8 सशस्त्र दूरक्षेत्र अंतर्गत गोरगरीब गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना 40 सायकलींचे वाटप करण्यात आलेले असुन सदर कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यात एकूण 55 सायकलींचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सालेकसा येथील पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, चालक पोलीस नायक रितेश अग्नीहोत्री, पोलीस शिपाई जितेंद्र पगरवार, पोलीस शिपाई प्रिती उके तसेच नक्षल प्रोपोगंडा सेल गोंदिया येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे, पोलीस हवालदार लियोनार्ड मार्टीन, पोलीस शिपाई भास्कर हरिणखेडे यांनी परिश्रम घेवून विशेष योगदान दिले आहे.