Tuesday, June 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedप्राथमिक आरोग्य केंद्राला जि.प.उपाध्यक्षांची आकस्मिक भेट

प्राथमिक आरोग्य केंद्राला जि.प.उपाध्यक्षांची आकस्मिक भेट

गोंदिया : जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा येथे आकस्मिक भेट घेऊन आरोग्य केंद्रातील परीस्थिती जाणुन घेतली.
गोरेगाव तालुक्यातील चोपा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रात गोर,गरीब, शेतमजूर व शेतकरी उपचार घेण्यासाठी येतात.परंतु चोपा येथील कर्मचारी कामचुकार व हलगर्जीपणा करतात अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष महोदयांनी आकस्मिक भेट घेऊन परीस्थितीचा आढावा घेतला व कर्मचाऱ्यांची कान उघडणी करून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना योग्य उपचार व मार्गदर्शन करण्याची सुचना दिली.यावेळी ओपीडी रजिस्टर, औषध साठा रजिस्टर, कर्मचारी हजेरीपट तपासणी करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सोमेश रहांगडाले,बाबा बहेकार,युवक अध्यक्ष सुरेंद्र रहांगडाले, गिरधारी कटरे, वैद्यकीय अधिकारी कनोजे व आरोग्य सेवा देणारे कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments