Friday, July 26, 2024
Google search engine
HomeUncategorizedफरार आरोपी 20 वर्षानंतर पोलीसांच्या जाळ्यात

फरार आरोपी 20 वर्षानंतर पोलीसांच्या जाळ्यात

गोंदिया : वरिष्ठांच्या निर्देशावर
पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली माननीय न्यायालयाने जारी केलेल्या हुकमाची अंमलबजावणी करण्याकरिता आरोपींचा शोध घेऊन स्टॅंडिंग वॉरंट ची बजावणी करून आरोपींना न्यायालयापुढे हजर करण्याबाबत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने दिनांक 31 मे 2023 रोजी राहणार- लबन तालुका बालोद , जिल्हा रायपुर जिल्हा रायपुर छत्तीसगढ येथील आरोपी देवेंद्रकुमार चंदराम साहू यास त्याचे राहते पत्ता राहणार- लबन तालुका बालोद बाजार , जिल्हा रायपुर,राज्य छत्तीसगढ येथून ताब्यांत घेण्यात आले आहे. आरोपीस अटक करण्यात येऊन मा. न्यायाधीश, न्यायालय आमगाव, यांचे कडील स्टँडिंग वॉरंट जारी केले असल्याने आरोपीस पोलीस स्टेशन सालेकसा येथे न्यायालयापुढे हजर करण्या संबंधाने स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपी देवेंद्रकुमार चंदराम साहू याचेवर पोलीस ठाणे सालेकसा येथे अपराध क्रमांक 94/2003 कलम 353, 420,34 भादवी अन्वये दिनांक 15/09/2003 ला गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचे मा. न्यायालय, आमगाव केस क्र. 188/ 2003 असे असून कलम 353, 420, 34 भादवी गुन्ह्याचा अपराध केल्याचा त्याच्यावर आरोप असल्याने स्टॅंडिंग वॉरंट काढण्यात आले होते. आरोपी हा 2003 ला गुन्हा केल्याच्या तारखे पासून अटकेपासून आपले अस्तित्व लपवून फरार होता.अश्या मा. न्यायालया ने स्टँडिंग वॉरंटद्वारे आदेश जारी केलेल्या 20 वर्षा पासून फरार आरोपीचा शोध घेऊन आरोपीस विशेष मोहीम राबवून पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. सदरची कामगिरी माननीय वरिष्ठांचे निर्देशा न्वये व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात विशेष मोहीम राबविणारे पथकातील पोलीस अंमलदार पो.हवा. ठाकरे, पो.ना.कटरे, पोशि झाडे, खोब्रागडे, चापोना शहारे यांनी कामगिरी केलेली आहे. माननीय वरिष्ठांनी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलीस अंमलदारांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments