गोंदिया : भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय नवी दिल्ली, महाराष्ट्र शासन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गोंदिया, नाबार्ड व बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमातून ग्रामीण बेरोजगारांना नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे.
बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था कुडवा (गोंदिया) द्वारे जिल्ह्यातील बेरोजगार युवक व युवतींना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरीता विविध प्रकारचे स्वयंरोजगार प्रशिक्षण आयोजित केले जात असून ही संस्था 21 जानेवारी 2011 पासून कार्यरत आहे. तसेच ही संस्था भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे संचालित केले जाते. स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने आजपर्यंत 7133 ग्रामीण बेरोजगारांना प्रशिक्षण दिले असून त्यापैकी 4948 बेरोजगार विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या प्रशिक्षणाच्या आधारे स्वयंरोजगार सुरु केला आहे. तसेच या संस्थेमध्ये विविध प्रकारचे कोर्स नि:शुल्क असून राहण्याची व जेवणाची नि:शुल्क सोय प्रशिक्षण संस्थेतच करण्यात येत आहे. बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार संस्थेद्वारे मोबाईल रिपेयरींग 30 दिवशीय मोफत निवासी प्रशिक्षण 17 एप्रिल 2023 पासून सुरु होणार आहे. तरी गोंदिया जिल्ह्यातील इच्छुक युवकांनी जास्तीत जास्त संख्येने व लवकरात लवकर सदर संस्थेत येऊन आपले नाव नोंद करावेत. ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगारांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा व तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार करावा. ग्रामीण भागातील बेरोजगारांना प्राधान्य देण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदनपत्र निदेशक, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान, वाहने पॅलेस, हरिणखेडे पेट्रोलपंपच्या जवळ, तिरोडा रोड, कुडवा (गोंदिया) येथे त्वरित जमा करावे. अधिक माहितीसाठी 07182-252007/ 9403359907 यावर संपर्क साधावा, असे संस्थेचे निदेशक राहुल गणवीर यांनी कळविले आहे.
बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार संस्थेद्वारे मोबाईल रिपेयरींग मोफत 30 दिवशीय निवासी प्रशिक्षण
RELATED ARTICLES