Tuesday, October 15, 2024
Google search engine
HomeUncategorizedबनावटी वस्तु तयार करणार्‍या तिघांना अटक

बनावटी वस्तु तयार करणार्‍या तिघांना अटक

गोंदिया : गोंदिया शहरात बनावटी (ड्युप्लीकेट) साहित्य, वस्तू, फेवी क्विकचा व्यवसाय करणाऱ्या चौघांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ८ हजार ८९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
मो. तौकीर मो. कालेखान चौधरी (वय 28, रा. जे. जे. कॉलोनी वजीरपुर अशोक विहार, उत्तरप्रदेश दिल्ली) टीम लीडर, सेमिता लिगल अॅडव्होकेट एन्ड सॉलिसिटर कंपनीतर्फे त्यांनी सर्व लिगल काम पाहण्याकरिता प्राधिकृत केले असल्याचे कळवून तक्रार केली होती. यात सेमिता लिगल फर्म नोयडा, दिल्ली पिडीलाईट कंपनीशी टायप असून पिडी लाईट कंपनीच्या माध्यमाने सर्व लिगल वस्तू या फर्मतर्फे पाहिली जातात. पिडीलाईट कंपनीच्या नावाने काही दिवसांपासून गोंदिया येथे बनावटी (ड्युप्लीकेट) वस्तू, साहित्य तयार करून विक्री केली जात असल्याबाबत व बोगस फेविक्वीकच्या विक्रीमुळे कंपनीचे खूप नुकसान होत असल्याचे सांगितले होते. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी सदर बाबतची वस्तुस्थिती जाणून घेवून कायदेशीर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांना आदेशित केले होते. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथकासह सदर बाबीची संपूर्ण शहानिशा करून गुप्त बातमीदारमार्फत प्राप्त खात्रीशिर माहितीअंती 14 मार्च रोजी सायंकाळी बजाज ट्रेडर्सचे मालक श्याम मोहनलाल बजाज (वय 54, रा. सिंधी कॉलोनी, गोंदिया), दिपक बच्चूमल लिलवानी (वय 24, रा. कुमारटोली, मालवीय वॉर्ड, गोंदिया), विवेक हरिशंकर गुप्ता (वय 34, रा. पी.ए. राईस मिलजवळ, मेंढे चौक, गोंदिया) यांना बनावटी (डूप्लीकेट) फेविक्वीक विक्री करताना, बाळगताना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी श्याम बजाज व दिपक लिलवानी याच्या बजाज ट्रेडर्स दुकानातून 2 हजार 395 रूपये किमतीचे 479 नग फेविक्वीक व विवेक गुप्ता याच्या घरातून 6 हजार 495 रूपये किमतीचे पिडीला ईट कंपनीचे नावाचे बनावटी फेविक्विक ट्यूब असा एकूण 8 हजार 890 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर छत्तीसगडच्या बिलासपूर येथील आरोपी प्रकाश खत्री हा आरोपी फरार आहे. प्रकाश खत्री हा गोंदिया येथील तिघांना तसेच इतरांनासुद्धा बनावटी माल पुरवित होते असे आरोपींनी सांगितले. पोलिसांनी आरोपींविरूद्ध कॉपी राईट अॅक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 51, 63, 65 प्रतिलिपी अधिकार अधिनियम 1957 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाद्वारे करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments