Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedबळीराजाकरीता विशेष 35 लाखाची अर्थसंकल्पात तरतूद

बळीराजाकरीता विशेष 35 लाखाची अर्थसंकल्पात तरतूद

24-25चा 16 कोटी खर्चाचा अर्थसंकल्प सादर

गोंदिया : जिल्हा परिषदेचा सन २०२3-२०२4 चा सुधारीत 28 कोटी 81 लाख 95 हजार  353 रुपये व २०२4-२5 चा १6 कोटी 04 लाख ४0 हजार 438 रुपयांच्या संभाव्य खर्चाचा अर्थसंकल्प जि.प.अर्थ सभापती योपेंद्रसिह (संजय) टेंभरे यांनी आज (दि.15) सभागृहात सादर केला . विशेष या अर्थसंकल्पात बळीराजाला मदत करण्याकरीता शेती सामग्री पुरवणे व विरजवान हुतात्मा स्मारक उभारण्याकरीता नवीन लेखाशिर्ष तयार करुन पहिल्यांदाच 35 लाख रुपयाची तरतूूद करण्यात आल्याची महत्वपूर्ण घोषणा जिल्हा परिषदेचे अर्थ सभापती टेंभरे यांनी केली.
अर्थसंकल्पात महिला बालकल्याण, समाजकल्याण, पाणी पुरवठा आणि कृषी विषयक योजनांवर तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी १ वाजता जि.प.च्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. जि.प.अध्यक्ष पंकज रहागंडाले यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरू सुरवात झाली. जि.प. बांधकाम तथा अर्थ सभापती संजय टेंभरे व मुख्य लेखा वित्त अधिकारी जनार्दन खोटरे यांनी सायकांळी 5  वाजता अर्थसंकल्प सादर केला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणवीर, कृषी व पशुसंवर्धन सभापती रुपेश कुथे, महिला बालकल्याण सभापती सौ. सविता पुराम, समाजकल्याण सभापती सौ.पुजा सेठ, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरंगनथन,अति.मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी.बी.खामकर यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
या अर्थसंकल्पात समाज कल्याण, ग्रामीण पाणी पुरवठा, महिला व बाल कल्याण व दिव्यांग कल्याणासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली.

विशेष म्हणजे घड्याळी तासिकेवरील शिक्षक नियुक्तीकरीता सुधारित अंदाजपत्रकात 1 कोटी रुपये तर 2024-25च्या संभाव्या अर्थसंकल्पात ३० लाख रुपयाती तरतूद करण्यात आली आहे.अटल क्रिडा स्पर्धेकरीता सुधारीत अंदाजपत्रकात 40 लाख रुपये तर सुधारित अंदाजपत्रकात 15 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी याकरीता जिल्हा परिषद सदस्यांच्या मागणीवरुन दुकानगाळे बांधकामाकरीता सुुधारित अंदादपत्रकात 60 लाख रुपये तर 2024-25च्या संभाव्य अर्थसंकल्पात 1.10 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. जि.प.सदस्यांच्या स्थानिक विकास निधीकरीता २०२4-25 या वर्षाकरीता २ कोटी 65 लाखाची तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाकरीता 32 लाख 64 हजार रुपये,समाजकल्याण विभाग,मागासवर्गीयांच्या कल्याणसााठी योजनेकरीता 71 लाख 91 हजार रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.दिव्यांग कल्याणासाठी ५ टक्के निधी अंतर्गत 28 लाख 20 हजार रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.महिला बाल कल्याण विभागाकरीता 1 कोटी 25 लाख 8 हजाराची तरतूद करण्यात आली आहे. कृषी विभागाकरीता 70 लाख 67 हजार, पशुसंवर्धन विभागाकरीता 61 लाख 86 हजार, सामान्य प्रशासन विभागाकरीता २ कोटी 25 लाख 90 हजार, वित्त विभागाकरीता 81 लाख 51 हजार रुपये, पंचायत विभागाकरीता  15 लाख ३१ हजार, लघु पाटबंधारे विभागाकरीता 70 लाख 3 हजार रुपयाचा निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आल्याची माहिती सभापती टेंभरे व मुख्य लेखा वित्त अधिकारी जनार्दन खोटरे यांनी सभागृहाला दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments