गोंदिया : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्याच्या पिकाचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, शिवसेना (उठाबा) बळीराजावर अन्याय सहन करणार नाही, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज यादव यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनानुसार, जिल्ह्यात काही दिवसांपासून अवकाळी पाऊस होत असून त्यामुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र शासनाने जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी अद्याप कोणतीही मदत जाहीर केली नाही. हे शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे. हा शेतकर्यांवर अन्याय आहे. त्यांच्या पिकाचे तातडीने पंचनामे करुन भरीव मदत तातडीने द्यावी, अन्यथा शेतकर्यांच्या हितासाठी शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बळीराजावर अन्याय सहन करणार नाही : पंकज यादव
RELATED ARTICLES