गोंदिया : आमगाव मुख्य रस्त्यावरील ग्राम लोहारा येथे आज दि.18 सप्टेबरला झालेल्या बस आणि दुचाकीचा धडकेत एक जागीच ठार तर एक गंभीर झाल्याची घटना घडली आहे.
सूत्रानुसार,दुचाकीधारक नामे,शैलेश मदन मरसकोल्हे वय 35 रा.कारूटोला/पुराडा हे आपली दुचाकी क्र.M H 35 A N 5016 घेवून देवरी मार्ग जात असताना,समोरून येणारी महामंडळाची एसटी बस क्रमांक M H 07 C 9307 ची दुचाकीला धडक झाली.धडक एवढी जबरदस्त होती की,दुचाकीवरील एक जागीच ठार झाला.तर एक गंभीर जखमी झाला.जखमीला ग्रामीण रुग्णालय देवरी येथे हलविण्यात आले. पुढील तपास पोलीस स्टेशन देवरी येथील हवालदार गुणवंत कठाने करीत आहे.
बसच्या धडकेत एक जागीच ठार
RELATED ARTICLES