गोरेगाव : गोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसराची पाहणी करुन गोदामाच्या बाजूला असलेल्या विहिरीची दुरावस्था बघून बाजार समितीचे नवर्निवाचित उपसभापती तेजेंद्र हरिणखेडे यांनी स्वच्छता आणि शेतकरी हिताच्या गोष्टींना प्राधान्य देण्यास सुरवात केल्याचे दिसून येत आहे.सभापती गिरधारी बघेले व इतर संचालकासोबत फेरफटका मारल्यानंतर जनावरांच्या पाण्याकरीता असलेल्या टाक्या स्वच्छ करण्यासोबतच स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी विहिरीची लगेच स्वच्छता करुन विहिरीतील सर्व घाण बाहेर काढण्याचे निर्देश सभापतींच्या उपस्थितीत उपसभापती हरिणखेडे यांनी स्वच्छता कामगारांना दिले.त्याचप्रमाणे शेतकरी बांधवाकरीता बाजार समितीच्या आवारातच वजन काटा सुरु करण्यात आल्याची घोषणा केली आहे.
बाजार समितीचे उपसभापती हरिणखेडे लागले कामाला
RELATED ARTICLES