गोंदिया : पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. निखील पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत दामिनी पथक यांना गोपनिय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, गोंदिया जिल्ह्यातील पो. स्टे. आमगांव हद्दीतील एका गावामध्ये एका 16 वर्ष 10 महीन्याच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्याचे दि. 22/06/2023 रोजी नियोजीत केले आहे.
सदर प्राप्त माहिती च्या अनुषंगाने दामिनी पथक आणि चाईल्ड लाईन गोंदिया यांचेसह पो. स्टाफ नी संयुक्तपणे सदर ठिकाण गाठले व पोलीस पाटील यांचेसह मुलीचे राहते घरी पोहोचले, त्यावेळी सदर मुलीची आई व अल्पवयीन मुलगी त्यांचे राहते घरी हजर होती. मुलीची योग्य ती चौकशी केली असता ती मुलगी 16 वर्ष 10 महीण्याची असल्याचे निदर्शनात आले. मुलगी अल्वपयीन असल्याने मुलीचे आई व आजी- आजोबा यांना समुपदेशन करून सदर नियोजीत विवाह रद्द करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. निखील पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली दामिनी पथक चे मपोउपनि प्रियंका पवार, पोशि राजेंद्र अंबादे, रमेंद्र बावनकर, मपोशि निशा बंसोड, पुनम मंजुटे, नेहा पाचे आणि चाईल्ड लाइन, गोंदिया चे जिल्हा समन्वयक विशाल मेश्राम, समन्वयक ज्ञानेश्वर पटले, व्यवस्थापक चाईल्ड मॅरेज वर्षा उमारे यांनी संयुक्तपणे कार्यवाही करून दिनांक 22/06/2023 रोजी नियोजीत केलेला बालविवाह रोखला आहे. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर यांनी दामिनी पथक आणि चाईल्ड लाईन यांनी अत्यंत कुशलतेने , सामजस्याने बालविवाह रोखण्यात यश संपादन केल्याने दामिनी पथकाद्वारें केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.
बालविवाह थांबविण्यास दामिणी पथकाला यश
RELATED ARTICLES