Tuesday, April 23, 2024
Google search engine
HomeUncategorizedबीएसएनएलच्या प्रशासकीय इमारतीला आग

बीएसएनएलच्या प्रशासकीय इमारतीला आग

भंडारा : शहरातील कारागृह मार्गावरील बीएसएनएलच्या दुमजली प्रशासकीय इमारतीला आग लागल्याची घटना आज, २३ एप्रिल रोजी अंदाजे पहाटे ५ वाजताच्या दरम्यान घडली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.या आगीत कार्यालयीन कागदपत्रे जळून राख झाली. महत्त्वाची दस्तऐवज जळाली आहे का, याबाबत तपास सुरू आहे. सुरक्षा रक्षकाने अधिकाऱ्यांना पहाटे कॉल करून इमारतीच्या खोलीतून धूर निघत असल्याचे सांगितले. ताबडतोब अग्निशमन दल, नगर परिषद मुख्याधिकारी जाधव व पोलीस विभागातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments