गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्रमांक 753 वरील खोबा येथे एका चारचाकी वाहन चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून दुचाकीला धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. दिगंबर परसराम पुस्तोडे (35) रा. रेंगेपार, ता. सडक अर्जुनी असे मृताचे नाव आहे.
दिगंबर पुस्तोडे हा नवेगावबांधवरून सडक अर्जुनीकडे आपल्या एमएच 35/ एई 0191 ने जात होता. तर एमएच 46/ बीएफ 5202 क्रमांकाची बोलेरो चारचाकी वाहन सडक अर्जुनीकडून नवेगावबांधकडे जात होती. बोलेरो वाहनचालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून दिगंबरर पुस्तोडे याच्या दुचाकीला समोरुन धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी बोलेररो चारचाकी वाहन जप्त केले असल्याची माहिती आहे.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219