गोंदिया : भंडारा व गोंदिया जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन, त्या माध्यमातून डॉक्टर घडावेत आणि रुग्णांना चांगली सेवा मिळावी, म्हणून खा. सुनील मेंढे यांचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे त्या अनुषंगाने त्यांनी मा.केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना भेटून मागणी केली होती.
गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवेश दिला जात असला तरी संथ गतीने सुरू असलेले निर्माण कार्य चिंतेचा विषय आहे. सर्व सुविधांनी युक्त वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्याच्या सेवेत कधी येणार, असा प्रश्न खासदारांनी विचारला.
खा.सुनिल मेंढे यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय म्हणाले की, गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयाला पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली असून महाविद्यालय निर्माणासाठी भू संपादनाच्या कामाला तांत्रिक अडचणीमुळे उशीर झाला. त्यामुळे महाविद्यालयाच्या बांधकामास दिरंगाई होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यादरम्यान केंद्रीय राज्य मंत्री आरोग्य आणि कुटुंब कल्याण, भारतीताई पवार यांनी प्रस्तावित जागेला भेट सुद्धा दिलेली होती. सध्या प्रस्तावित जागेवर संरक्षण भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले असून मुंबई ला तातडीची बैठक लावून उर्वरीत काम लवकरच पूर्ण होईल. त्यासाठी लागणारा निधी राज्यशासनाला केंद्राकडून पाठविण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्यासाठी तिसऱ्या टप्प्यात वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा करण्यात आली. या संबंधी बोलतांना खा.मेंढे म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेले मापदंड पूर्ण करण्याची क्षमता भंडारा जिल्ह्यात आहे. करिता लवकरात लवकर जनतेच्या सेवेसाठी वैद्यकीय महाविद्यालय होणे गरजेचे आहे. यावेळी उत्तर देतांना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयाचा डीपीआर राज्यशासनाने तयार करून केंद्राकडे पाठविल्यास त्याला त्वरित मंजुरी देण्यासाठी कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.
या संदर्भात मा.मुख्यमंत्री शिंदे साहेब व मा.उपमुख्यमंत्री श्री.देवेन्द्रजी यांच्या कडेही हा विषय पुन्हा मांडणार असल्याचे खा.मेंढे म्हणाले. जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात संसदेत प्रश्न उपस्थित करून खासदारांनी जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय लोकसभेत मांडला आहे.
भंडारा गोंदिया जिल्ह्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रश्न खा.सुनिल मेंढे यांनी संसदेत मांडला
RELATED ARTICLES