Tuesday, June 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedभरधाव ट्रक शेतात उलटला, दोन जण गंभीर

भरधाव ट्रक शेतात उलटला, दोन जण गंभीर

गोंदिया : वडसा कोहमारा राज्यमार्ग २७५ वर बुधवारी सकाळी हेटी खामखुरा गावानजीक एक भरधाव मालवाहू ट्रक रस्त्यालगतच्या शेतात उलटला. यात दोन जण जखमी झाले. ही घटना आज सकाळी घडली.
ट्रक मध्ये फसलेल्या एका इसमाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याला अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे हलविण्यात आले. ट्रकमधील साहित्याच्या खाली आणखी एक इसम दबून असल्याची माहिती आहे. अपघात नेमका कसा झाला हे कळले नसले तरी टायर पंचर होऊन ट्रक अनियंत्रित झाल्याने शेतात उलटल्याची चर्चा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments