गोंदिया : देवरी तालुक्यातील मोहगाव येथे गुरूवारी (दि.०८) भाजपसह इतर पक्षांतील कार्यकर्त्यांनी आमगाव देवरी विघानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांचे उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात घेतला.
यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे यांच्या कार्यसैलीवर प्रभावित होऊन विजय कुंभरे, लता फुले, सोनल कुंभरे, सीता कोरेटी, शामकला मडावी, जोतिबा फुले, अरुणा कोरेटी, गणेश उईके, शामरावजी उईके, श्रीराम मडावी, गिरीशजी हुर्रे, अंकालू अडदुल्ला, सुरेंद्र मेश्राम, वंदना धमगाये, सीशुपाल वालदे, पांडुरंगजी मडावी, सुदाम कोरेटी, बिसन वालदे, हिरालाल मडावी,आत्माराम कऱ्हाडे, गणाराम उईके, मीनाक्षी कोरेटी,उदाराम कोरेटी अशा शंभरावर कार्यकर्त्यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी कॉंग्रेसचे कार्यकर्ते रजिक खान, बळीराम कोटवार,छगन मुंगणकर, भीमराव नंदेश्वर,कैलाश घासले, कलिराम किरसान आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपसह इतर पक्षांतील कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश
RELATED ARTICLES