Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedभारताच्या उज्वल भविष्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा : नितीन गडकरी

भारताच्या उज्वल भविष्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा : नितीन गडकरी

अर्जुनी मोरगाव येथे भव्य प्रचार सभा
गोंदिया : मतदार मालक आहेत, आम्ही सेवक आहोत. त्यामुळे जनतेची सेवा निस्वार्थपणे करण्यासाठी व भारताच्या उज्वल भविष्यासाठी पुन्हा एकदा केंद्रात एनडीएचे सरकार आणून, नरेंद्र मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधानमंत्री बनविण्यासाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना प्रचंड मतानी विजयी करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
स्थानिक जिल्हा परिषद विद्यालयाच्या प्रांगणात आज, 7 एप्रिल रोजी महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ आयोजीत जाहीर सभेत ते बोलत होते. ना.गडकरी पुढे म्हणाले, भंडारा-गोंदिया जिल्हे निसर्गरम्य असून जल, जमीन, जंगल व जनावरे यांचा विकास होणे गरजेचे आहे. या जिल्ह्यात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. सिंचनासाठी पाणी ही प्रमुख समस्या आहे. वीज सध्या परवडणारी नाही. त्यासाठी भारत सरकारने सौरऊर्जा प्लॅन तयार केला आहे. सोलरच्या माध्यमातून पाणी समस्या मिटवा. दोन्ही जिल्ह्यात दुधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. मदर डेअरीच्या माध्यमातून दुधाला भाव उत्पादन वाढीच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झासीनगर उपसा सिंचन योजना पर्यावरण कायद्यामुळे अडकल्याचे समजले आहे. निवडणूक झाल्यानंतर या उपसा सिंचन योजनेला मार्गी लावू. आपण अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबविले आहे, ते केवळ मतदारांच्या आर्शीवादामुळे. 400 पार नंतर संविधान बदलविणार अशा प्रकारचे विष विरोधक पसरवित आहेत. मात्र गेल्या दहा वर्षात भाजपा सरकारने संविधानानुसारच भारताला जगाच्या नकाशात शक्तीशाली भारत बनवीले आहे. उलट कॉग्रेसनेच 80 वेळा संविधानात बदल केला आहे. यावेळी उमेदवार सुनील मेंढे, आ. मनोहर चंद्रिकापुरे, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी मंत्री डॉ. परिणय फुके, माजी आ. राजेंद्र जैन यांनीही सभेला मार्गदर्शन करुन महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना भरघोस मतानी निवडुन देण्याचे आवाहन केले. सभेला माजी आ. बाळाभाऊ काशिवार,डाॅ.हेमकृष्ण कापगते, विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, संजय भेंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष येशुलाल उपराडे, वीरेंद्र अंजनकर, डॉ गजानन डोंगरवार, नगराध्यक्षा मंजुषा बारसागडे, यशवंत गणवीर, गंगाधर परशुरामकर, यशवंत परशुरामकर, किशोर तरोणे, कविता रंगारी, लोकपाल गहाणे, विजय कापगते, जेष्ठ नेते नामदेव कापगते, केवळराम पुस्तोळे, लक्ष्मीकांत धानगाये, चामेश्वर गहाणे, अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील सर्व जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य तथा भाजपा,शिवसेना, राष्टवादी काॅग्रेस, पिरिपा व महायुतीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्यासह महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकारी, जिप, पंस सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. संचालन रचना गहाणे यांनी केले तर आभार लायकराम भेंडारकर यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments