गोंदिया : महाराष्टÑ राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन गोंदियाद्वारे 6 फेब्रुवारी रोजी ग्रामीण जनतेच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, जिल्हाध्यक्ष शेखर कनोजिया, जिल्हा सचिव प्रल्हाद उके, सहसचिव परेश दुरुगवार, उपाध्यक्ष चरणदास भावे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.
निवेदनात, वनहक्क जमीन नझूल जमीनीचे पट्टे द्या, आवास योजनेंतर्गत घरे बांधणाºया लाभार्थ्यांना किस्त देण्यात यावे, रोजगार हमी योजनेची कामे चालू करा, 600 रुपये मजुरी लागू करा, श्रावण बाळ, इंदिररा गांधी, राजू गांधी, वृद्धापकाळ कार्ड, अर्थसहाय्य दर महिन्याला देण्यात यावे, नागरिकांसह आवास योजनेतून घरे बांधणाºयांना कमी दरात वाळू द्या, वाळू तस्करांवर आळा घाला, प्रत्येक व्यक्तीला 35 किलो रेशन मोफत द्या, शेतमजूरांना 58 वर्षांमध्ये 6 हजार रुपये पेन्शन लागू करा आदी मागण्यांचा समावेश आहे. मोर्चामध्ये अशोक मेश्राम, बाबुराव राऊत, गुणवंत नाईक, गुलाब बोपचे, प्रकाश डाहट, जितू गजभिये, दुलीचंद कावळे आदी सहभागी झाले होते.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219