Tuesday, June 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedमतदानाच्या दिवशी सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

मतदानाच्या दिवशी सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

गोंदिया :  भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार असून 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा याकरीता निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व मतदारांना विविध प्रकारचे कार्यक्रम व उपक्रम राबवून आवाहन करण्यात आले असून मतदारांचा सहभाग वाढविण्याकरीता प्रशासनातर्फे प्रयत्न सुरु आहेत.

         निवडणूकीची मतदान प्रक्रिया खुल्या, निर्भय, शांततामय वातावरणात व निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सदर प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान साहित्यासह मतदान पथक 18 एप्रिल 2024 रोजी पोहचणार असून त्यांच्याजवळ ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व इतर सर्व संवेदनशील साहित्य राहणार आहे. सदर साहित्यास अपाय होऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 क्र.22 ची कलम 37 (1) (3) अन्वये निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मतदानाच्या कालावधीत विविध बाबींवर प्रतिबंध लागू करण्यात आले आहे. मात्र मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ठिक-ठिकाणी आठवडी बाजार आयोजित करण्यात येत असतो. त्यामुळे मतदानाच्या दिवशी नागरिकांच्या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याअर्थी बाजार व जत्रा अधिनियम 1862 चे कलम 5 (अ) व (क) अंतर्गत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवशी नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 19 एप्रिल 2024 रोजी गोंदिया जिल्ह्यातील सर्व ठिकाणी आयोजित करण्यात येणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments