Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedमतदार हा लोकशाहीचा आधारस्तंभ : जिल्हाधिकारी गोतमारे

मतदार हा लोकशाहीचा आधारस्तंभ : जिल्हाधिकारी गोतमारे

राष्ट्रीय मतदार दिवस साजरा : नवमतदारांना ओळखपत्र वाटप
गोंदिया : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तसेच देशाच्या विकासासाठी मतदार हा अतिशय मोलाचा पायाभूत आधारस्तंभ आहे. मतदारामुळेच लोकशाहीची ओळख आहे, असे मत जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात 13 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुभाष चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, गोरेगाव तहसिलदार सचिन गोसावी, जिल्ह्याचे आयकॉन दिव्यांग खेळाडू (राज्यस्तरीय) संजय घारपिंडे यावेळी मंचावर उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. गोतमारे पुढे म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे हा आपला अधिकार आहे. मतदान करण्यासाठी तरुणांचा सहभाग असणे आवश्यक आहे. मतदार हा देशाची ओळख बदलवू शकतो, त्यासाठी तरुणांनी मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे. मतदान करताना कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता, निर्भयपणे व नि:पक्षपाती मतदान करावे. लोकशाहीची किंमत काय आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. लोकशाही आणखी सुदृढ करण्यासाठी मतदान करणे ही तरुणांची जबाबदारी आहे. आपण आपले हक्क मागण्यासाठी आपली जबाबदारी काय आहे याची तरुणांना जाणीव असायला पाहिजे. तरुण युवक या देशाचे भविष्य आहेत. नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस जिल्हाभर साजरा करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांचे बी.एल.ओ.नी काटेकोरपणे पालन करावे. गरुड अ‍ॅपचा वापर करावा. सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा असे गोरेगाव तहसिलदार सचिन गोसावी यांनी सांगितले. यावेळी बी.एल.ओ. संघटनेचे अध्यक्ष प्रविण कोचे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मतदार प्रक्रियेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गोरेगाव तहसीलदार सविन गोसावी यांचा तसेच स्वीप कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे एस.व्ही.कनपटे, आर.जी.बोंबार्डे, सुरेश भावे, उमेशकुमार बावनकर, माया कठाणे, दिनेश पटेल, भिमराव साखरे, लक्ष्मी बन्सोड, धर्मेन्द्र बघेल, सविता मजुमदार त्याचप्रमाणे नवमतदार अमिशा उपराडे, अश्वीनी बनोटे, आदित्य वालदे, गायत्री अंबुले यांचा जिल्हाधिकाºयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले तर उपस्थितांचे आभार नायब तहसीलदार अप्पासाहेब व्हनकडे यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) श्रीराम पाचखेडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी धनंजय देशमुख यांचेसह नवमतदार बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments