गोंदिया : विश्वरत्न, परमपुज्य, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज गोंदिया शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या वतीने नवीन प्रशासकीय इमारत जवळील प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या पावन पवित्र स्मृतीस प्रणाम करीत विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली, कार्यालय गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमात यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच प्रमुख उपस्थितांकडून श्रद्धा सुमन अर्पित करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, अशोक सहारे, मनोहर वालदे, विनीत सहारे, सुनील भालेराव, माधुरी नासरे, आशा पाटिल, संध्या गोंडाणे, सुदर्शना वर्मा, खालीदभाई पठाण, नानू मुदलियार, भगत ठकरानी, केतन तुरकर, अखिलेश सेठ, हरबक्ष गुरणानी, दिपक कनोजे, तुषार उके, कपिल बावनथडे, राहूल वालदे, शैलेश वासनिक, सुनील पटले, लखन बहेलीया, राज शुक्ला, राहुल वालदे, रौनक ठाकूर, कुनाल बावनथडे, मोणू मेश्राम, वामन गेडाम सहित अन्य आदि उपस्थित होते.