Friday, June 14, 2024
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा अनावरण...

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा अनावरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न

गोंदिया : श्री शिव छत्रपती मराठा समाज गोंदिया व्दारा गोंदिया स्थित मनोहर चौक येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या शुभ पर्वावर प्रतिमा अनावरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या सोहळ्याला माजी आमदार श्री राजेंद्र जैन, माजी आमदार श्री गोपालदास अग्रवाल, सौ.परिणीती परिणय फुके, श्री चिन्मय गोतमारे, श्री अशोक इंगळे, श्री दामोधर अग्रवाल, श्री राजेंद्र जगताप, श्री दिपक कदम, सौ भावना कदम, श्री आदित्य सावंत, श्रीमती द्वारकाताई सावंत, श्री हुकूम अग्रवाल, मायाताई सनत, श्री राजा कदम, श्री संतोषदादा जाधव, शिलाताई सावंत यांच्या प्रमूख उपस्थितीत अनावरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.

यावेळी माजी आमदार श्री राजेंद्र जैन संबोधित करतांना म्हणाले की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमा अनावरण सोहळा प्रसंगी आम्हाला गौरवान्वित वाटते, त्यांच्या आदर्शावर चालणे व स्वप्नातील समाज घडविण्याचे आपण सर्वांचे ध्येय असले पाहिजे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दानकर्ते श्री आदित्य सावंत यांचे श्री जैन यांनी अभिनंदन केले. यावेळी मोठया संख्येने शहरवासी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments