Tuesday, June 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedमहिनाभर मोबाईलवर ऑनलाईन बैठका घेऊनही परिक्षेत 40 लिपिक अनुत्तीर्ण

महिनाभर मोबाईलवर ऑनलाईन बैठका घेऊनही परिक्षेत 40 लिपिक अनुत्तीर्ण

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कार्यरत कनिष्ठ लिपीक, वरिष्ठ लिपीक, पर्यवेक्षक, अधिक्षकांना त्यांच्या कामाबद्दल कितपत माहिती आहे,हे जाणून घेण्याकरीता निवडणुकीच्या काळात कर्मचारी यांना काम नसल्याचे गृहीत धरुन मोबाईलवर आॅनलाईन बैठका आयोजित करुन मार्गदर्शन आढावा घेण्याचे काम गेले महिनाभर चालले.त्या महिनाभर चाललेल्या प्रत्यक्ष व मोबाईलवरील बैठकीनंतर येथील एका सभागृहात परीक्षा घेण्यात आली.एवढंं करुनही ५० गुणाच्या परीक्षेत अंदाजे ४० कर्मचार्यांना ३५ गुणही मिळविता आले नाही.यावरुन ते कर्मचारी मुकाअ यांच्या परीक्षेत नापास झाले हे स्पष्ट झाले आहे.परंतु महिनाभर मोबाईलवर कार्यालयीन कामकाजाच्या वेेळेत चाललेल्या त्या आॅनलाईन बैठकांकडेही लक्ष नव्हते हे सुध्दा स्पष्ट झाले आहे.

कार्यशाळेत कनिष्ठ लिपीक, वरिष्ठ लिपीक, पर्यवेक्षक, अधिक्षक असे सर्व कर्मचारी जिल्हा परिषद मुख्यालय व पंचायत समिती मुख्यालयात कार्यरत आहेत त्यांना बोलावण्यात आले होते.एकाच दिवशी या सर्वांना बोलावल्याने त्या दिवसाचे प्रशासकीय कामकाज मात्र चांगलेच ठप्प झाले होते.अनेक कर्मचार्‍यांनी मुख्य अधिकार्‍यांना जर पारदर्शक व चांगले प्रशासकीय कामकाज करुन दाखवायचीच इच्छा आहे.तर अशा कार्यशाळा व परीक्षा घेण्यापेक्षा वर्षानुवर्ष एकाच विभागात ठाण मांडून बदलीच्या ठिकाणी न जाता वेळेवर विविध प्रमाणपत्र व शासन निर्णयाचा दाखल देत अडून बसतात आधी त्यांना आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील पंचायत समितीमध्ये कसे काम चालते. आणि तेथील कर्मचार्‍यांना जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात कसे काम केले जाते. याकरीता प्रात्यक्षिकाच्या रुपात ठराविक वेळेकरीता कर्मचारी अदलाबदल करुन त्या कर्मचार्‍याला शिकण्याची संधी दिली असती तर मोबाईलवरील आनलाईन बैठका व परीक्षेपेक्षाही अधिक चांगले कर्मचारी तयार करता आले असते बोलून दाखवले.मात्र जिल्हा परिषद मुख्यालयातील काही स्थायी व कंत्राटी कर्मचारी अधिकार्यांच्या मागेपुढे फिरून हो..ला ..हो करुन इतर कर्मचारी वर्गासमोर मीच कशा हुश्शार असे दाखवण्याच्या कार्यप्रणालीमुळे सुध्दा अनेक कर्मचारी मन मारुन काम करीत असल्याचे चित्र आजचेच नव्हे तर अनेक वर्षापासून असल्याचे बघावयास मिळते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments