ओबीसीचे वसतिगृह, लाख उत्पादन, हर घर नळ योजना आदींवर चर्चा
गोंदिया : गोंदिया जिल्हा नियोजन समितीची बैठक मा.ना.पालकमंत्री श्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. यात गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित वसतिगृहाचे काम गतिमान करून त्याची जागा व इमारतीचे बांधकाम करण्यात यावे यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवून निधी उपलब्ध करणे, भारताचे यशस्वी प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदीजी यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती व्हावी, जल जीवन मिशन अंतर्गत हर घर योजना दीर्घ काळ पर्यंत चालणाऱ्या पाण्याचं स्रोत व कामे दर्जेदार व्हावे, लाख उत्पादन वाढीसाठी महिलांना प्रोत्साहन द्यावे त्याकरिता त्यांना लाख अनुसंधान केंद्र नामकुंभ, रांची च्या धर्तीवर प्रशिक्षण दिल्यास रोजगाराची निर्मिती होईल आणि जास्तीत जास्त शेतकरी प्रेरित व्हावे, यासाठी शासकीय यंत्रणेने काम करावे, गोंदिया येथील भीमघाट परिसराच्या सौंदर्यीकरण व विकासाच्या तसेच गोंदिया जिल्ह्यातील विविध तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे खा.प्रफुल पटेल यांचे निवेदन पालकमंत्री ना.श्री धर्मरावबाबा आत्राम यांना दिले. आदी विषयावर माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी आज डीपीसी च्या सभेत चर्चा घडवून आणली. तसेच पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे लक्ष वेधून याबाबतीत माहिती घेतली.