गोंदिया : गोंदियात माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबारात लोकेश यादव हे गंभीर जखमी असून त्यांना तातडीने नागपूरला हलवण्यात आलं आहे. गोळीबाराच्या या घटनेनंतर गोंदिया शहरात खळबळ उडाली असून भीतीचे आणि दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार, गंभीर जखमी
RELATED ARTICLES