गोंदिया : तिरोडा तालुक्यातील खैरबोडी निवासी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चिंतामण रहागंडाले यांचे प्रेत त्यांचे गावातील गोडाऊन मध्ये आढळून आल्याने त्यांचा आकस्मिक मृत्यू, आत्महत्या की हत्या अशी चर्चा परिसरात होत असून तिरोडा पोलीसांनी प्रेत शव विच्छेदना करता उप जिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठवले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा चे माजी सभापती डॉक्टर चिंतामण रहांगडाले हे काल रात्री घरून बाहेर पडले होते व रात्रभर ते घरी आले नाहीत तसेच त्याचा मौबाईल वाजत असला तरी प्रतीसाद मीळत नसल्याने त्याचा सर्वत्र शोध सुरू असता त्यांचे गावालगतचे गोडाऊन मध्ये 5 मे रोजी प्रेत दिसून आल्याने त्यांचा आकस्मिक मृत्यू, आत्महत्या की हत्या अशी चर्चा होत असून तिरोडा पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रेताचा पंचनामा करून प्रेत उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे शव विच्छेदनाकरता पाठवले असून मृत्यूचे खरे कारण कोणते हे शव विच्छेदनानंतर कळणार असून डॉक्टर चिंतामण रहागंडाले यांचे मृत्यूचे माहितीमुळे तिरोडा परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे.
माजी सभापती चिंतामण रहागंडाले यांचा आकस्मिक मृत्यू
RELATED ARTICLES