नागपूर : रासायनिक खते घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे दोन वॅगन नागपुरातील कळमना रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर बुधवारी रात्री रुळावरून घसरले. हा अपघात अतरिक्त रेल्वेमार्गावर (कॉर्ड लाईनवर) झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला नाही.मालगाडी रुळावरून घसरल्याचे कळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात बचाव पथक (एआरटी) घटनास्थळी पाठवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. ४० वॅगन असलेली ही मालगाडी नागपूरमार्गे खंडवाकडे निघाली होती. कळमना रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरील ‘कॉर्ड लाईन’वरून बुधवारी रात्री आठ वाजता ही गाडी हावडा मार्गावर जाणार होती. मात्र, मुख्य मार्गावर पोहोचताच दोन वॅगन रुळावरून घसरल्या. दोन वॅगन गाडीपासून वेगळ्या करण्यात आल्या आणि गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.
मालगाडीचे दोन वॅगन रुळावरून घसरले; कॉर्ड लाईनवर अपघात
RELATED ARTICLES