गोरेगांव : गोरेगांव तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील नवनीत बौद्ध उपासक मंडळाच्या वतीने दिनांक 14 एप्रिल 2023 ला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वीं जयंती निमित्त पं.स.सदस्या सौ.शितलताई बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली, सांख्यिकी अधिकारी रुपेशकुमार राऊत व तंमुस अध्यक्ष गिरीश पारधी यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न प.पु. डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले. व केक कापण्यात आला. तसेच जयंतीनिमित्त गावात जंगी शोभायात्रा काढण्यात आली.
भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ, समाजसुधारक असलेल्या बाबासाहेबांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणी अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली.
अशा महामानवास अभिवादन करण्यासाठी माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन, ग्राम मुंडीपारचे उपसरपंच बी.जी.कटरे, मोरेश्वर चौधरी,लोकचंद राहांगडाले, राजेंद्र बिसेन, ग्रा.पं. सदस्या सौ.भुमेश्वरीताई पारधी, सौ.सरिताताई सुरजोसे, आम्रपालीताई राऊत,माजी ग्रा.पं.सदस्या छायाताई बिसेन,
बंडुभाऊ राऊत,बाबुराव राऊत,प्रल्हाद कटरे,सुरेश धमगाये सर,भुरदास राऊत, माणिकचंद गमधरे तसेच गावातील सर्व लोक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच सुमेंद्र धमगाये यांनी केले.
मुंडीपार येथे नवनीत बौद्ध उपासक मंडळाच्यावतीने महामानव परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी
RELATED ARTICLES