मुंबई। आज दिनांक 14 /12/22 रोजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई येथे समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या बाबत बैठक संपन्न झाली.
या बैठकीसाठी आमदार विनोद अग्रवाल, आमदार कैलास पाटील, शालेय शिक्षण सचिव मा. रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त पुणे मा. सुरज मांढरे, SCERT संचालक मा. राजेश पाटील, महाराष्ट्र प्राथमिक परिषद, प्रकल्प संचालक मा.कैलास पगारे साहेब, सहसचिव शिक्षण मा. इम्तियाज काझी, अवर सचिव शिक्षण मा. संतोष गायकवाड, उपसंचालक मा.समीर सावंत इत्यादी मान्यवर बैठकीसाठी उपस्थित होते.
बैठकीतील निर्णय
1 समग्र शिक्षा अभियानातील करार कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10 टक्के मानधन वाढ एप्रिल 2022 पासुन करणे.
2 शासनाच्या विविध पदभरती मध्ये वयोमर्यादा शिथिल करून समायोजनाची संधी उपलब्ध करून देणे.
3 समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांची निवृत्ती वय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 60 ते 65 वयापर्यंत वाढवणे.
4 13 महिन्याचे मानधन 12 महिन्यांमध्ये विभाजित करून अर्जित रजा उपभोगण्यासाठी साठी देणे.
5 महिला कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा देणे.