गोंदिया : देवरी तालुक्यात अवैध गौण खनिज मुरुम व वाळू तस्करी जोरात सुरु आहे. काहि गटानां मंजुरी मिळाली असली तरी महसुल नियमाचा पलिकडे मरुम/मातीचा खोदकाम जोमात सुरू आहे. 50 ब्रास रॉयलटिच्या मागे 200 ब्रास मुरूम काढुन विकली जात आहे. विशेषता तालुक्यात कोनतेही रेती घाट मंजुर नसुनही नदी – नाल्यामध्ये कच्चा रस्ता तयार करून ट्रक्टर – टीप्परच्या माध्यमातुन लाखो ब्रास अवैध मुरुम – रेती उत्खनन करीत असतांना देवरीचा महसुल विभाग हात बांधून बसला होता.
भर्रेगाव, सुंदरी दंड, शिरपुर/बांध, गोटाफोडी, पांलादुर/जमी, चिचगड, शिलापुर, पालांदुर/जमी सह तालुक्याच्या अनेक ठिकाणावरुन आजही नदि नाल्यामंधुन राजरोसपणे मुरुम व रेतीचे अवैध उत्खनन करून रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यात पुरेशी प्रशासकीय यंत्रणा असतांनाही अर्थ कारणामुळे मुरुम व रेती तस्करांना आळा घालण्यात अपयशी ठरत असल्याची चर्चा नागरीकांत होत आहे. आता मुरूम व रेती तस्करांची हिम्मत वाढली आहे. तहसिलदारांनी अवैध रेती तस्करी कायम स्वरुपी थांबविण्याकरीता उपाययोजना केल्या असल्या तरी शासनाचा तिजोरीला लाखोचा चुना लावल्या जात आहे. अवैध मुरुम व रेती वाहतुकीवर महसुल विभागाचा वचक नसल्याचे या अवैध उत्खनन व वाहतुकीमुळे समजुन येत आहे. त्यामुळे अवैध मुरुम व रेतीची वाहतुक देवरी शहरास तालुक्यात चांगलीच सुरू आहे. अवैध वाहतुक करणाºयांना प्रशासकीय अधिकाºयांचे पाठबळ असल्याची चांगलीच चर्चा असुन मुरुम व रेती माफियांचा मनमानी कारभार सुरु आहे.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219