‘त्या’ व्यापाऱ्याची चौकशी करून तात्काळ कारवाई करा : जीवन आधार फाउंडेशनची मागणी
गोंदिया : गोरेगाव तालुका खरेदी-विक्री संस्थेचे भडंगा येथील सभासद राजकुमार बकाराम भोयर यांचे निधन झाले असून त्यांच्या नावावर एका व्यापाऱ्याने बोगस धान विक्री करून धानाची व बोनसची रक्कमही लुटला. त्यामुळे त्या व्यापाऱ्याची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जीवन आधार फाउंडेशनचे रेस्क्यू फोर्सचे विदर्भ अध्यक्ष सतीश वाघ यांनी जिल्हा पणन अधिकारी पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गोरेगाव तालुकामधील व्यापारी हे शेतकाऱ्यांच्या नावावर बोगस धान खरीदी दाखवून करोडो रूपयांची लूट करत असल्याचे निदर्शनास आले आहे. तालुक्यातील भडंगा येथील मृत शेतकरी राजकुमार बकाराम भोयर आधर क्र. 714069365156 असून त्यांची मृत्यू 19/04/2021 रोजी झाली. मात्र, त्या मृतकाच्या नावाखाली बोगस धान विक्री करण्यात आले व त्यांच्या धानाची व बोनसची रक्कम व्यापाराद्वारे दीपक नरेंद्रकुमार रहांगडाले याच्या बँक खाते क्रमांक.***4778 जोडून त्यांच्या नावे 5 जुलै 2021, 9 सप्टेंबर 2021 व 14 सप्टेंबर 2021 असे तीन दा चुकीच्या पद्धतीने शासनाशी धोखाधडी करून बँकेतून पैसे विड्रॉल करण्यात आले. अशा शेकडो उदाहरण तालुक्यात आहेत. त्यामुळे शासनाची लुट करणाऱ्या त्या व्यापाऱ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सतीश वाघ यांनी जिल्हा पणन अधिकारी पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मृत सभासदाच्या नावावर धानाची विक्री
RELATED ARTICLES