Thursday, December 5, 2024
Google search engine
HomeUncategorizedमॅरेथॉन स्पर्धेतुन नवयुवकांनी केली “स्पर्श “कुष्ठरोग जनजागृती

मॅरेथॉन स्पर्धेतुन नवयुवकांनी केली “स्पर्श “कुष्ठरोग जनजागृती

गोंदिया : केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दि.30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जिल्ह्यात “स्पर्श“ कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.अभियाना दरम्यान जनजागृती व सर्वेक्षणावर विशेष भर देण्यात येत आहे.“स्पर्श“ कुष्ठरोग जनजागृती अभियान पंधरवड्यात जिल्ह्यात 8 फेब्रुवारी रोजी जागतिक कुष्ठरोग जनजागृती अभियाना अंतर्गत जिल्हास्तरीय खुली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.पुरुष 5 कि.मी. व महिला 3 कि.मी. ह्या वर्गात खुली मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. मॅरेथॉन रन सकाळी आठ वाजता जयस्तंभ चौक येथून सुरुवात होऊन आमगाव रोड वरून सारस चौक जिल्हा परिषद येथे समापन होऊन परत मुळ ठिकाणी पार पड्ली.मोठ्या संख्येने नवयुवा वर्ग,आरोग्य विभाग व के.टी.एस. सामान्य रुग्णालयातील अधिकारि व कर्मचारी यांनी कुष्ठरोगाला हरविण्यासाठी स्पर्धेत भाग घेतला.मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ.रोशन राऊत,वरिष्ठ पोलीस निरिक्षक नंदिनी चांदपुरकर,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल यांनी हिरवी झेंडी दाखवली. 150 नवयुवक व 50 अधिकारी, कर्मचारी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते.जिल्हास्तरीय खुली मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुरुष गटात रोहित पटले, आकाश भोयर,,निखार भेलावी,भुषण मंजुटे, मिलिंद कोवे तर महिला गटात आरती भगत,सुषमा रहांगडाले,प्रिया सनाव,अश्विनी चुटे,केसीनी राऊत यांनी पुरस्कार पटकावले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना व स्पर्धा भाग घेणार्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कुष्ठरोगावरील म्हणी/घोषवाक्य/ पोष्टरच्या माध्यमातुन मोठी जनजागृती ह्या वेळी करण्यात आली.
जिल्हास्तरीय खुली मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी साठी जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी प्रशांत खरात, डॉ. अनिल आटे, कुष्ठरोग विभागाचे नंदकिशोर चकोले, भुपेंद्र भोकासे, संतोष बोरकर, रंविद्र जाधव,जगदिश पंचभाई, अशोक मुंडपीलवार, अनिल पडोले, तसेच केटीएस, आयुश विभागाचे अधिकारी ,कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments