मुख्यमंत्र्यांशी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी निवेदनासह केली चर्चा
गोंदिया : भंडारा येथे शासन आपल्या दारी या उपक्रमानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदेजी आले असता माजी आमदार राजेंद्रजी जैन यांनी मुख्यमंत्र्यांचे जिल्ह्याच्या आगमन प्रसंगी स्वागत केले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांशी विविध विषयांवर चर्चा करताना गोंदिया जिल्ह्यात शासन आपल्या द्वारी हा उपक्रम घेण्यात यावा तसेच गोंदिया येथील मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे यासंबंधीचे मा. खासदार श्री प्रफुल पटेल जी यांचे पत्र देऊन निवेदन दिले. गोंदिया व भंडारा जिल्हयातील धान पिकाला पेरवा या रोगाने ग्रासल्याने धानाची उत्पादन क्षमता कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करणे, धानाला बोनस देणे, प्रलंबित सिंचनाच्या समस्या मार्गी लावण्यात याव्यात यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर माजी आमदार राजेंद्र जैन यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केली.