चोरीच्या 3 मोटार सायकली हस्तगत
गोंदिया : दिव्यांश रंगलाल लील्हारे रा. कुडवा गोंदिया यांनी दिनांक 06/03/2024 चे 19/00 वा.ते 20/30 वा. दरम्यान त्याचे मालकी ची पॅशन प्रो मो. सायकल क्र. एम.एच-35/ऐ.के – 8176 किमती- 30,000/-रु.ची आयुष्य हॉस्पिटल समोर पार्किंग करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याचे रिपोर्टवर पोलीस स्टेशन रामनगर गोंदिया येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 60/024 कलम 379 भा. दं.वि. अन्वये दाखल करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यातील चोरी, घरफोडी गुन्ह्याचे अनुषंगाने दिलेल्या निर्देश सूचनाप्रमाणे सदर गुन्ह्याचे तपासात उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग गोंदिया रोहिणी बानकर मॅडम, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस स्टेशन रामनगर यांचे मार्गदर्शनात डी. बी . पथकातील पोलीस अधिकारी – अंमलदार यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपी व मोटर सायकल चा शोध करीत असताना मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे – *आरोपी ईसंम नामे- दुर्गेश देवकरण भगत वय- 24 वर्ष राहणार- कटंगीटोला** यास ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यातील चोरीस गेलेली मो. सा. आणि ईतर चोरी संबंधाने विश्वासात घेवून विचारपूस केली असता आरोपी यांनी गुन्ह्यात चोरी गेलेली मोटर सायकल सह आणखी इतर दोन मोटर सायकली चोरी केल्याचे सांगितले. आरोपीचे ताब्यातून गुन्ह्यातील आणि ईतर चोरीच्या दोन मो.सा. पॅशन प्रो. क्र. एम. एच.- 35/ऐ.के- 8176 किमती- 30,000/-रु, हिरो स्प्लेंडर प्लस एम. एच- 35/ ए. डी.1205 किमती -30,000/-रु., बजाज कंपनीची विक्रांता मो.सा. क्र. एम. एच.35/ ए. एफ.- 1311 किमती- 40,000/-रु.अश्या एकूण तीन चोरीच्या मोटार सायकली किमती- 1,10,000 /-रु च्या आरोपीकडून हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेल्या आहेत. *आरोपी-दुर्गेश देवकर भगत रा. कटंगीटोला* यास अटक करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई मा. वरिष्ठांचे निर्देशांप्रमाणे व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक – संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनात सपोनी उमेश माळी, स.फौ. राजेश भुरे, नामदेव बनकर, पो. हवा. छत्रपाल फुलबांधे, सुनीलसिंह चौव्हाण, बाळकृष्ण राऊत, कपिल नागपुरे, चालक पवार यांनी केली आहे.