तिघांना अटक, वरठी पोलिसांची कारवाई
भंडारा : मोहाडी तालुक्यातील मोहगाव परिसरातील शेतातून मोटारपंप चोरून नेणाºया तीन चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. वरठी पोलिसांनी 10 तासांत प्रकरणाचा छडा लावून आरोपींना अटक केली.
मोहगाव येथील गोरख ढोबळे यांची रोहणा गावालगत नदी काठावर शेती आहे. त्यांनी शेतीला सिंचनासाठी लावलेले मोटारपंप अज्ञात चोरांनी 21 जानेवारीच्या मध्यरात्री चोरून नेले. याबाबत वरठी ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिस निरीक्षक निशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी तत्काळ दखल घेऊन तपास सुरू केला. माहितीदारांच्या आधारे अवघ्या दहा तासात रोहणा येथील तीन चोरांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीला गेलेले मोटारपंप जप्त करण्यात आले. रामू तुमसरे, गोपाल सेलोकर व सत्यशील कापसे अशी चोरट्यांची नावे असून त्यांना अटक करण्यात आले. तिघांना न्यायालयापुढे हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तपास वरठी पोलिस करीत आहेत.
मोटारपंप चोरट्यांचा दहा तासात लावला छडा
RELATED ARTICLES