गोंदिया : घरुन सलून दुकानात जात असलेल्या सलून व्यवसायकास एका १६ वर्षीय युवकाने निष्काळजीपणाने मोटार सायकल वेगात चालवून धक्का दिल्याने अपघातात सलून व्यवसायकाचा जागेवरच मृत्यू झाला असून मोटार सायकल चालकाची सुद्धा तब्येत चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक गोरेगांव तालुक्यातील घुमर्रा येथील मुळ निवासी असलेले लिलेश्वर उदराज लांजेवार वय – ४० हे गोंदिया येथील बालाघाट रोडवरील फुलबांधे यांच्या सलून दुकानात सलून केश कर्तनालयाचा काम करीत होते. त्यामुळे, लांजेवार हे सासुरवाडी असलेली चारगांव येथे राहत असत.
नेहमीप्रमाणे आज लिलेश्वर लांजेवार हे सकाळी ०६ वाजता चारगांववरुन गोंदियाला निघाले. आणि दरदिवस सारखे रावणवाडी येथे सायकल ठेवून बस प्रवासी थांबाकडे जात असताना १६ वर्षीय मुरपार निवासी गिलेश दिनेश दमाहे या युवकाने मोटार सायकल क्रमांक एम एच ३१ सी वाय २६७० ही निष्काळजीपणाने वेगात चालवून लांजेवार यांना जबर धक्का दिल्याने जागेवरच मृत्यू पावले. तर मोटार सायकल युवक दमाहे हा सुद्धा गंभीर असून गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
लिलेश्वर लांजेवार यांचे अंत्यसंस्कार गोरेगांव तालुक्यातील घुमर्रा यामुळगावी करण्यात आले असून गावी शोककळा पसरली आहे. पश्चात पत्नी, दोन मुली आणि बराच आप्तपरिवार आहे.
मोटार सायकल अपघातात एक मृत, एक गंभीर
RELATED ARTICLES