Tuesday, April 23, 2024
Google search engine
HomeUncategorizedमोटार सायकल चोरट्यास तब्बल चोरीच्या 12 मोटर सायकलीसह अटक

मोटार सायकल चोरट्यास तब्बल चोरीच्या 12 मोटर सायकलीसह अटक

स्थानिक गुन्हे शाखा, पथकाची विशेष कामगिरी

गोंदिया : पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी पोलीस निरीक्षक -दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांना जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मोटार सायकल चोरी व मालमत्ता विषयक गुन्हयातील गुन्हेगारांचा शोध घेवून विशेषतः मोटर. सायकली चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते.

या अनुषंगाने पोलीस निरीक्षक- दिनेश लबडे, यांनी स्था. गु. शां. येथील पोलीस अधिकारी- अंमलदार यांची पथके तयार करून याबाबत सूचना देवुन गुन्हे उघडकीस आणण्याचे मार्गदर्शन करण्यात आले होते. याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकाद्वारे जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मोटार सायकल चोरी, व मालमत्ता विषयक गुन्हयातील गुन्हेगारांची संपुर्ण माहिती घेण्यात येवून गुन्हे शाखा पथका कडून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटार सायकली चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेत असताना दिनांक 16/12/ 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पो . स्टे. तीरोडा येथील दाखल गुन्ह्यातील मोटार सायकल सराईत गुन्हेगार ईसंम नामे- राहुल ऊर्फ चंगा लील्हारे रा. अंगुर बगीचा गोंदिया याने चोरलेली आहे..तसेच त्याने नागपूर, भंडारा,गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता मोटार सायकली चोरलेल्या असून त्याने विक्रीच्या उद्देशाने विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या आहेत. अश्या प्राप्त खात्रीशिर माहिती व माहितीची खातरजमा केल्यानंतर सराईत गुन्हेगार आरोपी नामे- राहुल ऊर्फ चंगा सुखचांद लील्हारे वय 21 वर्षे रा. अंगुरबगीचा गोंदिया* यास तीरोडा गुन्ह्यातील चोरीच्या मोटार सायकलसह मौजा- बाम्हणी, तुमसर जिल्हा- भंडारा येथून ताब्यात घेवून जेरबंद करण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारास चोरी केलेल्या ईतर मोटार सायकली बाबत चौकशी, विचारपूस केली असता सुरवातीस त्याने उडवा- उडविचे उत्तरे दिली. पुन्हा विश्वासात घेवून त्यास विचारपूस केली असता त्यांनी गोंदिया, भंडारा तसेच नागपूर जिल्हयातून विविध ठिकाणाहून मोटार सायकली चोरी केल्याचे सांगितले. नमूद सराईत गुन्हेगार आरोपी यांचे सांगणेप्रमाणे त्याचे ताब्यातून त्यांनी भंडारा, तुमसर ,नागपूर अश्या विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या विना नंबर असेलल्या तसेच खोटे क्र. असेलल्या चोरी केलेल्या एकूण 12 मोटार सायकली एकूण किंमती 4, लाख 88,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे. सदर जप्त मोटार सायकल पैकी 1 मो.सा. ही पो. स्टे. तीरोडा दाखल गुन्ह्या क्र. 1046/2023 कलम 379 भा.दं.वि. चे गुन्ह्यातील असल्याने नमूद सराईत मोटार सायकल चोरट्यास जप्त 12 मोटर सायकली मुद्देमालासह पो.स्टे.तिरोडा पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. अधिकचा तपास..पो. स्टे. तीरोडा पोलिस करीत आहेत.  सदरची कामगिरी मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक- दिनेश लबडे, यांचे नेतृत्वात स. पो.नि. विजय शिंदे, पो. उप. नि. महेश विघ्ने, वनिता सायकर, पोलीस अंमलदार पो.हवा.राजू मिश्रा, महेश मेहर, भुवन देशमुख, चित्तरंजन कोडापे, सोमेंद्र तूरकर, रियाज शेख, इंद्रजित बिसेन, सुजीत हलमारे, लक्ष्मण बंजार, घनश्याम कुंभलवार, संतोष केदार, तसेच पो.स्टे. पोलीस निरीक्षक, देविदास कठाडे, पो. उप नि. पुंडे, पो.हवा.दिपक खांडेकर, पो.शि.शैलेश दमाहे यांनी कामगिरी बजावलेली आहे. नमूद गुह्यातील गुन्हेगारांची इत्यंभूत विशेष माहिती प्राप्त करण्यात पो.हवा.राजु मिश्रा यांनी विशेष परिश्रम घेतले आहे..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments