भंडारा : मोदी-अदानी यांच्या महाघोटाळ्याविरोधात सोमवारी दुपारी जिल्हा काँग्रेसच्या वतीने भंडारा शहरातून पर्दाफाश रॅली काढण्यात आली. माजी राज्यमंत्री बंडू सावरबांधे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, जयश्री बोरकर, नंदा पराते, जिया पटेल, जि. प. अध्यक्ष गंगाधर जिभाकटे, सभापती रमेश पारधी, मदन रामटेके, स्वाती वाघाये यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली.
सामान्य जनतेचे पैसे अदानीच्या घशात घालणार्या व लोकशाहीचे धिंडवडे उडवून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणार्या मोदी सरकार विरोधात पदार्पाश रॅलीचे आयोजन शहरातील हुतात्मा स्मारक ते त्रिमूर्ती चौकापर्यंत करण्यात आले.
हँडनबर्ग संस्थेच्या अहवालानुसार अदानी कंपनीच्या गैरव्यवहाराचे संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी. महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात यावे. ओबीसींची जातीय जनगनणा करावी. कृषी पंपांना १२ तास विद्युत द्यावी, रेतीघाट लिलाव न झाल्यामुळे अनेक खासगी व शासकीय बांधकामे रखडलेले आहेत. जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव करून किंवा शासकिय दराने बांधकामाकरिता रेती उपलब्ध करून द्यावी. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे जाचक अटी कमी करून कामे सुरू करण्यात यावी. उमरेड-पवनी-कन्हांडला अभयारण्य, गोसेखुर्द प्रकल्प, बावनथडी प्रकल्प यांच्या पुनर्वसनाच्या प्रलंबीत समस्या दूर करण्यात याव्या. रखडलेला भेल प्रकल्प सुरू करण्यात यावा. निलज-पवनी-कारधा महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी ही रॅली काढण्यात आली.
यावेळी मधुकर लिचडे, प्रमोद तितिरमारे, विकास राऊत, प्रेमसागर गणवीर, प्यारेलाल वाघमारे, राजू निर्वाण, उत्तम भांडारकर, शंकर राऊत, राजेश हटवार, उमेश कटरे, शंकर तेलमासरे, धनराज साठवणे, राजू पालिवाल, धनंजय तिरपुडे, राजकपूर राऊत, प्रशांत देशकर, कैलास भगत, राकेश कोडापे, मंजुषा चव्हाण, सारिका नागदेवे, स्वती हेडाऊ, मनीषा निंबार्ते, योगश गायधने, शंकर राऊत, प्रेम वनवे, अनिता भुरे, सोनू कोटवानी व कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येनी उपस्थित होते.
मोदी-अदानी यांच्या महाघोटाळ्याविरोधात काँग्रेसची पर्दाफाश रॅली
RELATED ARTICLES